- स्थान: मठ हे वेंगुर्ला तालुक्यात आहे, जे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्याचा एक भाग आहे.
- प्रशासकीय माहिती: मठ ग्रामपंचायत वेंगुर्ला पंचायत समिती आणि सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येते.
- आकर्षण: मठ ग्रामपंचायतीच्या प्रमुख आकर्षणांपैकी श्री स्वयंभू मंदिर व श्री सातेरी मंदिर आहे.
- गावातील प्रमुख पिके: भात शेती.
मठ गावाची माहिती
मठ गावाच्या चारही बाजूला वेतोरे, खानोली, आडेली, वेंगुर्ला, तुळस ही गावे आहेत. मठ येथील श्री स्वयंभू मंदिर व श्री सातेरी मंदिर ही मंदिरे प्रसिध्द आहेत. गावात लोकांच्या प्रवासाची सोय म्हणुन एस.टी.ची सोय आहे. गावातील माती लाल आहे. गावात दळणवळण, नळयोजना, दूरध्वनी, वीज अशा पायाभुत सुविधा उपलब्ध आहेत. हवामान उष्ण व दमट असून जून, जुलै, ऑगस्ट, व सप्टेंबर या महिन्यात पाऊस पडतो. गावातील एकुण क्षेत्रापैकी ४६७-५०-०० हेक्टर ऐवढी शेत जमीन आहे व १९१-०२ हेक्टर लागवडीला अयोग्य आहे. गावात १०० लहान शेतकरी, ४५० अल्पभुधारक व भुमीहीन शेतकरी आहेत. गावात दळणवळणाच्या सुविधा व आरोग्य उपकेंद्र, पाण्याच्या सुविधा, सार्वजनिक व खाजगी विहिरी आहेत. हवामान उष्ण दमट आहे. भात हे प्रमुख पीक आहे. गावात मराठा, भंडारी, चर्मकार, बौध्द, महार, या जातीचे लोक राहतात. त्यांचे आपापसातील संबंध सलोख्याचे आहेत. येथील लोकांची शेती, मोलमजुरी, व्यापार ही उत्पन्नांची साधने आहेत.

